Wednesday 22 March 2023

Successful entrepreneurs of the world

Entrepreneurs who rose from the ash and touched the seventh heaven 

 From rag to riches 




Saturday 19 November 2022

 

Shikshanmaharshi Bapuji Salunkhe College Karad

Department of Commerce

 


                          भारतातील यशस्वी उदयोजक भित्तिपत्रिका 


                             





                          


भित्तिपत्रक प्रकाशन वृतांत

 

                             भारतातील यशस्वी उदयोजक

                                                                दिनांक:-  18/11/2022

                    श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे, शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे वाणिज्य विभागामार्फत 'भारतातील यशस्वी उद्योजक' या विषयावर भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यासाठी प्रा. डॉ.भरत पाटील (वाणिज्य विभाग प्रमुख, मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव) व प्रा. जी आर वास्के (वाणिज्य विभाग प्रमुख, एल बी एस कॉलेज सातारा) यांच्या हस्ते करण्यात आले या  कार्यक्रमास प्र.प्राचार्य महेश गायकवाड सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.  प्रा.भरत पाटील सर  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नवनवीन कल्पनांना मूर्त स्वरूप  आणून  उद्योग सुरू करता येतात व त्यासाठी जोखीम स्वीकारून स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती करण्याचा सल्ला दिला. प्रा. वास्के सरांनी त्यांच्या मनोगतात विविध यशस्वी उद्योजकांचे दाखले दिले. हे भित्तिपत्रक विद्यार्थ्यांच्या मध्ये उद्योजकीय मानसिकता तयार करण्यात मदत करेल व त्यातून नवीन उद्योजक निर्माण होतील असा आशावाद व्यक्त केला.   या भित्तिपत्रक प्रकाशनाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी पौर्णिमा कलबुर्गी हिने केले, माहिती कु. ऋतिका चाळके हिने दिली. सदर कार्यक्रमाचे आभार कु.सावनी भोपते हिने मानले.

 

प्रा. एम.एस. सूर्यवंशी                                                            प्रा. एस. एस.कणसे

(वाणिज्य विभाग प्रमुख)                                                         (वाणिज्य विभाग)

Friday 18 November 2022

                     " वाणिज्य शाखेतील करिअर संधी "या  विषयावर कार्यशाळा संपन्न 






                







                           
                                                           कार्यक्रम अहवाल 

वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी"

                                                                                             वार व दिनांक: शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबर, २०२२

                                                                                                                                 ठिकाण: नवीन इमारत हॉल नं. ०९

                                                                                                                                 वेळ: सकाळी ९:३० ते दुपारी १२:३०

                       श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथील वाणिज्य विभाग व सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड (स्वायत्त) अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे आयोजन दोन सत्रामध्ये करण्यात आले होते. कार्यशाळेचा उद्देश बारावीनंतर व पदवीनंतर वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना करिअरमध्ये उपलब्ध असणाऱ्या संधीची माहिती होणे, तसेच त्याकारिता विद्यार्थ्यांनी काय तयारी करावी असे होते.

पहिल्या सत्राचे मार्गदर्शक मा. प्रा. डॉ. भरत पाटील वाणिज्य विभाग प्रमुख, मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, कडेगाव हे होते. पाटील सरांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. पारंपरिक वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधींची माहिती देतादेता जरा हटके करिअर पर्यायांची तोंड ओळख करून दिली, जसे ह्युमेनिटीज लॉ, इकॉनॉमिक्स, हॉस्पिटेलिटी आणि एव्हीएशन, हॉटेल मॅनेजमेंट इन्व्हेंट मैनेजमेंट ट्रॅव्हल आणि टुरिझम, मीडिया मैनेजमेंट शिक्षक प्रशिक्षण, लॉ कोर्स, रिटेल आणि फॅशन मर्चनडाईझ इत्यादी.

दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक मा. प्रा. गणेश वास्के वाणिज्य विभाग प्रमुख, एल. बी. एस. कॉलेज, सातारा होते, वास्के सरांनी अपयशातून यशाकडे प्रवास केलेल्या उद्योजकाची अनेक उदाहरणे दिली. उद्योजकानी उद्धृत केलेली प्रेरणादायी वाक्ये वाचून दाखवली एमबीए (फायनान्स). ई-कॉमर्स क्षेत्रात, स्टॉक ब्रोकिंग अॅण्ड इन्व्हेस्टमेंट ऍनालिस्ट, बी. कॉम इन टॅकण्ड टुरिझम (होकेशनल), बैंक डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट्स, व्हेंचर कॅपिटल, विमा, पोर्टफोलिओ मैनेजमेंट इ. करिअर पर्याय सुचवले.
कार्यशाळेचे अध्यक्ष मा. प्राचार्य, डॉ. महेश गायकवाड यांनी नवीन शैक्षणिक धोरण यामुळे बदलणाऱ्या अभ्यासक्रमाकडे संधी म्हणून पहावे, विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रसंगास सामोरे जाण्यासाठी तयार राहिले पाहिजे असे अध्यक्षीय मनोगतात अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अग्रणी महाविद्यालय योजना समन्वयक प्रा. सचिन बोलाईकर यांनी अग्रणी महाविद्यालय योजनेचा इतिहास, उद्देश इ. सांगितले मार्गदर्शक मार्गदर्शक साधनव्यक्तींची ओळख अर्थशास्त्र व वाणिज्य विभागप्रमुख डॉ. मारुती सुर्यवंशी यांनी करून दिली. आभार डॉ. रणजित लिधडे यांनी मानले तर कार्यशाळेचे सूत्रसंचलन प्रा. तबस्सुम आत्तार यांनी केले. या कार्यशाळेस महिला महाविद्यालय, कराड येथील प्रा. वैशाली काटकर, डॉ. ज्योती मोहोळकर, पाच विद्यार्थिनींसह हजर राहिल्या. तसेच महाविद्यालयातील ज्युनिअर विभागातील, सिनिअर विभागातील ७१ विद्यार्थी-विद्यार्थिनीनी कार्यशाळेचा लाभ घेतला. या प्रसंगी अग्रणी महाविद्यालय विभाग सदस्य प्रा. महेश लोहार व महाविद्यालयातील प्रा. खोत, डॉ. टिपुगडे, प्रा. कापसे, प्रा. विश्वनाथ सुतार, डॉ. नाईक, प्रा. अंगापूरकर मॅडम, प्रशासकीय सेवक तात्या कदम, पंकज कुंभार यांचे सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालायतील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व प्रशासकीय वर्ग यांनी उपस्थित राहून कार्यशाळा यशस्वी करण्यात योगदान दिले...

                                                        

Successful entrepreneurs of the world

Entrepreneurs who rose from the ash and touched the seventh heaven    From rag to riches