कार्यक्रम अहवाल
वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी"
वार व दिनांक: शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबर, २०२२
ठिकाण: नवीन इमारत हॉल नं. ०९
वेळ: सकाळी ९:३० ते दुपारी १२:३०
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथील वाणिज्य विभाग व सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड (स्वायत्त) अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे आयोजन दोन सत्रामध्ये करण्यात आले होते. कार्यशाळेचा उद्देश बारावीनंतर व पदवीनंतर वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना करिअरमध्ये उपलब्ध असणाऱ्या संधीची माहिती होणे, तसेच त्याकारिता विद्यार्थ्यांनी काय तयारी करावी असे होते.
पहिल्या सत्राचे मार्गदर्शक मा. प्रा. डॉ. भरत पाटील वाणिज्य विभाग प्रमुख, मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, कडेगाव हे होते. पाटील सरांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. पारंपरिक वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधींची माहिती देतादेता जरा हटके करिअर पर्यायांची तोंड ओळख करून दिली, जसे ह्युमेनिटीज लॉ, इकॉनॉमिक्स, हॉस्पिटेलिटी आणि एव्हीएशन, हॉटेल मॅनेजमेंट इन्व्हेंट मैनेजमेंट ट्रॅव्हल आणि टुरिझम, मीडिया मैनेजमेंट शिक्षक प्रशिक्षण, लॉ कोर्स, रिटेल आणि फॅशन मर्चनडाईझ इत्यादी.
दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक मा. प्रा. गणेश वास्के वाणिज्य विभाग प्रमुख, एल. बी. एस. कॉलेज, सातारा होते, वास्के सरांनी अपयशातून यशाकडे प्रवास केलेल्या उद्योजकाची अनेक उदाहरणे दिली. उद्योजकानी उद्धृत केलेली प्रेरणादायी वाक्ये वाचून दाखवली एमबीए (फायनान्स). ई-कॉमर्स क्षेत्रात, स्टॉक ब्रोकिंग अॅण्ड इन्व्हेस्टमेंट ऍनालिस्ट, बी. कॉम इन टॅकण्ड टुरिझम (होकेशनल), बैंक डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट्स, व्हेंचर कॅपिटल, विमा, पोर्टफोलिओ मैनेजमेंट इ. करिअर पर्याय सुचवले.
कार्यशाळेचे अध्यक्ष मा. प्राचार्य, डॉ. महेश गायकवाड यांनी नवीन शैक्षणिक धोरण यामुळे बदलणाऱ्या अभ्यासक्रमाकडे संधी म्हणून पहावे, विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रसंगास सामोरे जाण्यासाठी तयार राहिले पाहिजे असे अध्यक्षीय मनोगतात अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अग्रणी महाविद्यालय योजना समन्वयक प्रा. सचिन बोलाईकर यांनी अग्रणी महाविद्यालय योजनेचा इतिहास, उद्देश इ. सांगितले मार्गदर्शक मार्गदर्शक साधनव्यक्तींची ओळख अर्थशास्त्र व वाणिज्य विभागप्रमुख डॉ. मारुती सुर्यवंशी यांनी करून दिली. आभार डॉ. रणजित लिधडे यांनी मानले तर कार्यशाळेचे सूत्रसंचलन प्रा. तबस्सुम आत्तार यांनी केले. या कार्यशाळेस महिला महाविद्यालय, कराड येथील प्रा. वैशाली काटकर, डॉ. ज्योती मोहोळकर, पाच विद्यार्थिनींसह हजर राहिल्या. तसेच महाविद्यालयातील ज्युनिअर विभागातील, सिनिअर विभागातील ७१ विद्यार्थी-विद्यार्थिनीनी कार्यशाळेचा लाभ घेतला. या प्रसंगी अग्रणी महाविद्यालय विभाग सदस्य प्रा. महेश लोहार व महाविद्यालयातील प्रा. खोत, डॉ. टिपुगडे, प्रा. कापसे, प्रा. विश्वनाथ सुतार, डॉ. नाईक, प्रा. अंगापूरकर मॅडम, प्रशासकीय सेवक तात्या कदम, पंकज कुंभार यांचे सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालायतील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व प्रशासकीय वर्ग यांनी उपस्थित राहून कार्यशाळा यशस्वी करण्यात योगदान दिले...
No comments:
Post a Comment