Shikshanmaharshi Bapuji Salunkhe College Karad
Department of Commerce
भारतातील यशस्वी उदयोजक भित्तिपत्रिका
भित्तिपत्रक प्रकाशन
वृतांत
भारतातील यशस्वी उदयोजक
दिनांक:- 18/11/2022
श्री स्वामी विवेकानंद
शिक्षण संस्थेचे, शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे
वाणिज्य विभागामार्फत 'भारतातील यशस्वी उद्योजक' या
विषयावर भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यासाठी
प्रा. डॉ.भरत पाटील (वाणिज्य विभाग प्रमुख, मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या
महाविद्यालय कडेगाव) व प्रा. जी आर वास्के (वाणिज्य विभाग प्रमुख,
एल बी एस कॉलेज सातारा) यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास प्र.प्राचार्य महेश गायकवाड सर यांची प्रमुख
उपस्थिती लाभली. प्रा.भरत पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
नवनवीन कल्पनांना मूर्त स्वरूप आणून उद्योग सुरू करता येतात व त्यासाठी जोखीम
स्वीकारून स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती करण्याचा सल्ला दिला. प्रा. वास्के सरांनी
त्यांच्या मनोगतात विविध यशस्वी उद्योजकांचे दाखले दिले. हे भित्तिपत्रक विद्यार्थ्यांच्या
मध्ये उद्योजकीय मानसिकता तयार करण्यात मदत करेल व त्यातून नवीन उद्योजक निर्माण
होतील असा आशावाद व्यक्त केला. या भित्तिपत्रक प्रकाशनाचे प्रास्ताविक
विद्यार्थिनी पौर्णिमा कलबुर्गी हिने केले, माहिती कु. ऋतिका चाळके हिने दिली. सदर
कार्यक्रमाचे आभार कु.सावनी भोपते हिने मानले.
प्रा. एम.एस. सूर्यवंशी प्रा.
एस. एस.कणसे
(वाणिज्य
विभाग प्रमुख)
(वाणिज्य विभाग)
No comments:
Post a Comment